स्त्री
स्त्री
स्त्री जन्मा तुझी कहाणी
नको आणू डोळ्यामध्ये पाणी
तळपती होऊन तलवार दुधारी
नव्या बदलाची कर तयारी
सहनशीलतेचा अंत संपला
अन्यायाच्या तोड शृंखला
तुझीच तू हो कल्याणी
मिटवून टाक जुनी कहाणी
नकोच आता पंख छाटली पक्षिणी
स्व रक्षणा घे भरारी गगनी
दुर्गा चामुंडा होऊन मर्दिनी
अन्यायाचा आण निःपात घडवुनी
वाघिणीचे दूध शिक्षण
पिऊन घे तू पटकन
नवे रूप करुनी धारण
सामर्थ्याचे कर संगोपन
सृष्टीची निर्मिती तू महान
सृजनतेचे तुला वरदान
पेलूनी दाखव तू कमान
तुझ्याचसाठी मोकळे मैदान
