STORYMIRROR

Shalu Krupale

Inspirational

3  

Shalu Krupale

Inspirational

कर्तव्यनिष्ठ

कर्तव्यनिष्ठ

1 min
229

बंदिस्त पाकळ्यांना

उमलण्याची ती आस

पिंजऱ्या बाहेरील जग

बघण्यासाठी का तो त्रास...०१


बळ असूनही पंखात

उडण्यास सक्त मनाई

स्वच्छंदी पाखराला

सिद्ध होण्याची ती घाई.... ०२


समाजकंटकाचे तोंड

कायमचे बंद केले

चारही दिशादिशात

कर्तुत्व थोर दिसले...०३


निर्भीड झाली आता

झुगारून सारी बंधने

धैर्याची गाठ पाठी

ती शिकली खरे जगणे....०४


कर्तुत्वाचा रोवून झेंडा

गाजविले तिने प्रभुत्व

कणखर शुर बाला

पदरात अति ममत्व...०५


शिकली आदर्शाचे गुण

दोन घराण्याची शान

बहुआयामी ती महिला

हवा सर्वांना अभिमान...०६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational