STORYMIRROR

Shalu Krupale

Inspirational

3  

Shalu Krupale

Inspirational

जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

1 min
201

दरवाज्यातून

ते डोकावतांना

नेहमी दिसती

घर जागतांना...०१


जेष्ठ नागरिक

घरातील छान

करू या आपण

त्यांचा सन्मान....०२


आयुष्यभर त्यांनी

केले काबाडकष्ट

लेकरासाठी हो

खाल्ले अन्न उष्ट ....०३


घर उभारणी

त्यांच्या प्रयत्नांनी

छत्रछाया देती

प्रेम वर्षावांनी....०४


खचले शरीर

मन ते हळवे

पुन्हा बालपण

जन्म जणु नवे....०५


एकांतात त्यांना

ठेवू नका कधी

विनाकारणच

जडेल हो व्याधी...०६


नातवंडांना ते

देती माया फार

घरादारातही

कृपा ती अपार...०७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational