रक्तदान
रक्तदान
*देऊ या जीवन*
*करू रक्तदान*
*दाना हूनी श्रेष्ठ*
*हेच महादान*
*मदतीचा हात*
*जनसेवेसाठी*
*थेंब थेंब देऊ*
*त्यांच्या प्राणासाठी*
*रक्ताच्या थेंबात*
*आहे मोठे बळ*
*माणुसकीचा हा*
*विश्वास सबळ*
*सत्कार्य घडते*
*रक्तदानातून*
*मानवधर्म हा*
*घडतो हातून*
*पोहोचते प्रेम*
*नसानसातून*
*मिळे नवाजन्म*
*याच दानातून*
*रक्तदानाचे पुण्य*
*मिळवू या जगी*
*महादान हेच*
*बनू खरे योगी*