STORYMIRROR

Shalu Krupale

Others

3  

Shalu Krupale

Others

विरह

विरह

1 min
172

होते मी जे जोडले

बंद प्रेमाचे तोडले

प्रिया तु रे बेईमान

अर्ध्या वाटेत सोडले...०१


आसवांचा पूर माझ्या

नयनात साचलेला

देह झाले नश्वर ते

धीर माझा खचलेला....०२


असाहाय्य वेदना ह्या

विचलित करतात

मनातील भाव माझे

रोज रोज मरतात.....०३


त्रान नाही शरीरात

प्राण पखेरू उडती

एक एक क्षण आज

शस्त्र बनूनी छेडती...०४


तुझ्यासवे घालवले

नानाविध सौख्य क्षण

टपकती अश्रुधारा

झाले जगणे कठीण...०५


सोडलास साजना तु

हात जेव्हा जीवनात

सोसवेना विरह तो

मृत्यू येईल क्षणात....०६


Rate this content
Log in