STORYMIRROR

Shalu Krupale

Inspirational

3  

Shalu Krupale

Inspirational

सुदृढ आरोग्य

सुदृढ आरोग्य

1 min
546

सुदृढ आरोग्य

राहावे म्हणून

शुद्ध खानपान

करा आवर्जून


प्रकृति जापावी

नियम पाळावे

तैलीय पदार्थ

खाण्याचे टाळावे


उघड्यावरचे

खाणे करा बंद

शिळेपाके अन्न

जलद दुर्गंध


शुद्ध शाकाहारी

फळं आणि रस

सात्विक भोजन

असावे सकस


खाण्याच्या वेळाही

ठेवा ठराविक

पोटापुरते खा

नको ते अधिक


व्यायाम व योगा

करा नियमित

आयुष्य लाभेल

तुम्हां सुरक्षित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational