क्षण आठवांचे
क्षण आठवांचे
साठवून ठेवले मी
क्षण आठवांचे गोड
उकलते निशिदिन
जुने प्रश्न थोडं थोडं
झाले पुलकित मन
जाण होता त्या स्पर्शाची
रोमरोमी बहरले
काय तुलना त्या हर्षाची
नदी किनारी बैसोनि
घालविले गोड क्षण
आज कातरवेळी रे
झाली तुझी आठवण
उमलणे बहरणे
मनसोक्त ते हसणे
रागावणे क्षणातच
अवखळ ते वागणे
स्मरणात ठाई ठाई
तुझे रूप बसलेले
क्षण आठवांचे प्रिया
नाही कधी विसरले

