STORYMIRROR

Shalu Krupale

Inspirational

3  

Shalu Krupale

Inspirational

नातं बापलेकाच

नातं बापलेकाच

1 min
216

खांद्याला-खांदा भिडतो जेव्हा

बाबा बोलतात आपल्या लेकराला,

जरी बिकट परिस्थिती या समयी

तरी लावीन तुझ्यासाठी प्राण पणाला..०१


दिवसभर उन्हातानात राबणारा बाप

जेव्हा दिसतो लेकराला धापा टाकतांनी

तोच मुलगा जाणू शकतो दुःख बापाचे

येऊ देत नाही कधी डोळ्यात पाणी..०२


बालवाडी पासून ते कॉलेज पर्यंत

बाबा देती शिक्षणासाठी आधार

ठेवुनी बापाच्या कर्तव्याची जाण

लेकरू करितो जिद्दीने स्वप्न साकार....०३


सुखदुःखाच्या गोष्टी सांगती एकमेकां

नातं बापलेकाच खऱ्या मैत्रीच

स्वप्नांचा डोंगर सजवतो डोळ्यात

पोरगा पूर्ण करेल हे शब्द खात्रीच...०४


घरातील शिस्तबद्ध वातावरणात

हवे खेळीमेळीचे ते काही क्षण

दबदबा नको बाप होण्याचा

खेळावे मुलासोबत मित्र बनून.....०५


मुलांचा सुरक्षा कवच तो बाप

त्याला नसते स्वतःच्या सुखाची आस

लेकरांच्या भविष्यासाठी झिजतो सदा

आयुष्यात त्यांच्या लावतो सुखांची आरास...०६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational