STORYMIRROR

Shalu Krupale

Inspirational

3  

Shalu Krupale

Inspirational

शिक्षक

शिक्षक

1 min
256

माझ्या आठवणीतील शिक्षक

नाव त्यांचे कोल्हटकर सर

शिकवती भूगोल,नागरिक शास्त्र

होते कॉमेडीचे महाशिकंदर


गोल मटोल हसरा चेहरा त्यांचा

डोक्यावर केसांचा थांगपत्ता नाही

कर्तव्यनिष्ठ आणि प्रांजळ स्वभाव

साऱ्यांनाच आपलसं करु पाही


भूगोलाचा नकाशा समजवितांनी

काठमांडूला, कुठे मांडू म्हणायचे

सह्यांद्रीच्या पर्वतरांगा उतरवितांनी

कळसुबाई ला हळूच हाणायचें


समुद्र व नद्यांचे चित्र काढतांनी

वाकड्यातिकड्या रेषा ओढायचे

भारताचा नकाशाला मात्र

फळ्यावर हुबेहूब काढायचे


उद्गारवाचक चिन्ह आला की

आम्हाकडे आ'वासून बघायचे

मोठे मोठे डोळे विस्फारून

थोडे गरा गरा फिरवायचे


अशा त्यांच्या कृतीमुळे

भूगोलाचा तास आवडायचा

कोल्हटकरसर वर्गात कधी येतील

याकडेच साऱ्यांचा डोळा असायचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational