STORYMIRROR

Shalu Krupale

Inspirational

3  

Shalu Krupale

Inspirational

भारत देशात

भारत देशात

1 min
172

माझ्या भारत देशात

गंगा यमुना व सरस्वती

उदरात घेऊनी अमृतधारा

कडेकपारी वाहत जाती.....०१


हिमालय हा पर्वत राजा

तटस्थ उभा सीमा रक्षणार्थ

हिंदी महासागराचा किनारा

गातोय महिमा यथार्थ........०२


हिरवे हिरवे शेत खेळते

काळ्याआईच्या ऊदरात

सोन्याचा ती घास देती

मोत्याचा दाणा पदरात.....०३


जाती-धर्म बोलीभाषा

विविध जरी वेशभूषा

काम कार्ये असो वेगळे

मनात मात्र निर्मळ आशा......०४


जपतप पूजा पाठ करती

भारतीय मानती यज्ञ कर्म

सुख शांती ची मनोकामना

प्रत्येक नागरिकांचे हेच मर्म....०५


बंधुभाव व स्नेह दर्शन

मना मनात रुजलेला

मानपान आदर भाव

कणाकणात सजलेला.......०६


विभिन्नतेत दिसे एकता

जगात एकच भारत माता

सुसंपन्न संस्कृतीने नटलेली

किती वर्णू तिची यशोगाथा....०७

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational