नारीशक्ती
नारीशक्ती
1 min
171
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
महान त्यागाची मूर्तस्वरूप
हिम्मत कधी हरली नाही
लावण्य,लज्जेचा शृंगार जरी
दिपवल्या कर्तृत्वाने दिशा दाही.....१
नव्या युगाची नारीशक्ती
मंदिरातील ज्योत तेजस्वी
गगनभरारी स्त्री पंखांची ही
लहरीतुनी गाई गीत ओजस्वी.....२
कालपरत्वे बदलून स्वतःला
मर्दानी झालीस हिरकणी
नाव कोरले विश्व पटलावर
साक्ष इतिहासाच्या पानोपानी.....३
लक्ष्मी, जिजाऊ, सावित्रीने
बीजे रोवली नवक्रांतीची,
लता, आशा, कल्पना, उषा
शान वाढवली जगी भारताची....४
जुन्या - नव्याची घालून सांगड
नारीशक्ती आजही लढते आहे,
आव्हानांवर होउनी स्वार तारका
अस्मानी तेजप्रभा दाखवू पाहे....५
गर्भात नारीच्या पौरूष प्रसवते
प्रतीक ती नवनिर्माण, सृजनाचे
कोमलांगी परी दुर्बल नाही मुळी
इतिहासी दाखले मिळती सामर्थ्याचे....६
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️