जैसे ज्याचे कर्म तैसे
जैसे ज्याचे कर्म तैसे
जीवन जगता जगता
मागे वळता नाही आलं
किती चूक किती बरोबर
ठरवणं बाजूलाच राहिलं !! धृ !!
वाईट वागलो चूक आहे
व्यक्तीनं मधला फरक आहे
समजून घेऊन त्यावरी
उपाय करणं योग्य आहे !! १ !!
दुसऱ्याची चूक आहे
प्रत्यक्ष दाखवून द्यावे म्हणतो
खोट्या आशेवर रेंगाळत
त्यावर पांघरून घालण्यास टाळतो !! २ !!
कर्म करावे , स्वच्छ मनाने
लालची कधी न व्हावे
मिळेल ते पोटभर
आपले मानून खावे !! ३ !!
योग्य दिशा , योग्य वळण
योग्य ही आपली संस्कृती
मानणारे आहेत हजार पण
अंगी उतरवणारे कमी !! ४ !!
अंगी उतरवणारे कमी !! ४ !!