वारी पंढरीची!!
वारी पंढरीची!!
देव माझा विटेवरी
शोभितो हा पंढरी
दोन्ही कर कटेवरी
रक्षणार्थ उभा राही!!धृ!!
वारीत जावे अन
दुःख निवारावे
आनंदी राहावे
संतुष्ट जगावे!!१!!
आषाढी एकादशी दिनी
वारी असे ही पंढरी
शोभितो हा भक्तीचा नाद
आमच्या या पंढरपुरी!!२!!
तल्लीन तुझ्या भक्तीत
आम्ही वारकरी देवा
घे आम्हा तुझ्या कुशीत
लेकरे तुझी रे देवा!!३!!
शोभतो हा नाद
तुझ्या या नगरी
जागतो दिवसा आम्ही
तुझ्या या अभंगी
तुझ्या या अभंगी!!४!!