आठवणीतील क्षण
आठवणीतील क्षण
सौम्य वाहत झरे ओलांडले
किंचित काही राहुनी गेले
सुचले जरी त्याक्षणी मला
पूर्ण आता ह्याक्षणी करावे !! धृ !!
स्वप्न मी पाहतच होतो
कष्टाची ही जोड नव्हती
काय करावे नि कसे पहावे
अंतरात ही सवड नव्हती !! १ !!
जगुनी घेतो आता मी
सुखास जातो भेटाया
दुःखास देतो उत्तर आता
नकोस येऊस पुन्हा भेटाया !! २ !!
थांब ना तू जरा
उडुदे मज आकाशी
पाहुदे हे जग आता
माझ्या ह्या डोळ्यांनी !! ३ !!
जिथे आवड तिथे सवड
शिकलो मी माझ्या अंगणी
झेप घ्यायची सुरवात ही
उंच उडण्यास मज लागती !! ४ !!
कोण कुठे कधी तरी
यावे शिकवण्यास मज
उलगुडे रहस्य जीवनाचे
अन पसरावे सूर्याचे तेज !! ५ !!
अन पसरावे सूर्याचे तेज !! ५ !!