STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

आरोग्य खरी संपत्ती

आरोग्य खरी संपत्ती

1 min
213

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

     धावपळीच्या क्षणात या

     आरोग्याची कदर करू,

     श्वासाला उसंत देऊन

     महत्त्व त्याचे जाणू.....


    चंचल सारी लक्ष्मी जी

    प्रिय असे आम्हांस,

     दुय्यम स्थान मुळी नको

     मुल्यवान आरोग्यास....


   आरोग्यदायी सवयीची

   पाठराखण सदा करावी,

    समतोल आहारातून

   तन-मन प्रफुल्लित व्हावी.


   व्यायामाचे महत्त्व जाणूनी

   सुदृढ शरीर संपदा आणू,

   जीवनाच्या प्रवासात

   आरोग्य खरी संपत्ती जाणू

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational