माणुसकीच्या भिंती
माणुसकीच्या भिंती
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कोरोनाच्या महाप्रलयातच
गरज माणूसकीच्या भिंतीची,
तुटलेल्या मनोभावनांना
सहकार्याने सावरण्याची.....
प्रेम, जिव्हाळ , विश्वास
सहकार्य भावना सद्गुण,
एकमेका हात देऊन
जोडू तुटलेली मनं.....
माणूसकीच्या भिंती आता
बांधू आपण निरपेक्षपणे,
पडझडीला आलेले विश्वास
जोडू कायमचे सापेक्षपणे...
इथे,तिथे शोधण्यापेक्षा
स्वत:त आधी शोधू,
माणुसकीची किंमत
जगास दाखवून देऊ......
इतरांसाठी फुलांचे बगीचे
दखल याची होत असते,
माणुसकीचे महान कार्य
प्रारब्धास सावरत असते.....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷
