जळता कशाला कुणावर
जळता कशाला कुणावर
स्वच्छंदी ते पाखरू
उडू द्या आज गगणभर
यशस्वी होऊ पाहतो तो
ओढू नका पाय जमिनीवर...०१
दाह झेलुनी संघर्षाचे
खटाटोप केला संसारी
विजयाचे तुरे मिळवतोय
जळू नका तुम्ही तयावरी...०२
स्वर्गसुख आज भोगतोय
जगतोय तो जर आनंदाने
वाद घालू पाहता तुम्ही
आज त्याच्याशी विनाकारने...०३
गरीबांच्या सेवेसाठी
झटला तो दिवसराती
फळ स्वरूप सुख लाभे
स्वानंदा ते घरी नांदती...०४
तुलना करता त्याच्याशी
दोस देता स्वताच्या नशिबाला
प्रयत्नांती परमेश्वर लाभे
विसरू नका या घोषवाक्याला..०५
जळता कशाला कुणावर
नशीब हवे सुख भोगायला
जैसे कर्म तैसेच मिळे फळ
शिकू या चांगले वागायला...०६
