चहा
चहा
पिवळसर सोनेरी किरणांनी भेट पहा दिली कशी
आळस झटकला अवयांनी हातात चहाची कप बशी
बरसणाऱ्या धुंद सरी अन् झोंबणारा गारवा
फक्कड चहासोबत जणू भासे आठवणींचा सोहळा
चहा न पिल्याशिवाय दिवसाची सुरूवात ती कसली
पेपर वाचतांना आवाज करून घेतलेला घोट हाच असली
जेव्हा घ्याल तुम्ही चहाचे घोट चार
अटके पार पळतात तेव्हा तुमचे विचार
आनंद भरतो मनात गोडवा नात्याला निरंतर देई
चहाच्या प्रत्येक घोटात सुख समाधान मिश्रित होई
बेधुंद बरसणारा हा पाऊस एक कप
मसालेदार कडकडीत गरम चहा
मग त्यावर रंगलेल्या मजेदार गोष्टी पहा
सारे किस्से इथेच रंगतात खुले होतात
परीक्षा... ते परीक्षा संपल्यानंतरचे ते
दिवस इथेच आठवले जातात
माहीत नसलेल्या गोष्टी येथे तर ज्ञात होतात
एक कप चहाचा अन होतात
कॉलेजच्या कट्ट्यावर मैफिली थेट
तिथेच होतात मग साऱ्यांच्या भेटीही ग्रेट
चहा गार होत आहे या आवाजाची
तर ओढच ही निराळी
आठवतात रंगणारे किस्से आणि दिलेली टाळी
वेळ आणि याचं अतूट नातं
गारव्यात सुगंधाच्या मागे मग पाऊल पडतं
संपत आला दिवस तरीही मन उत्साह पूर्ण होत
रोज दुपारनंतरचा चहा नवा उत्साह मात्र देत
चहाची गोडी नाही कशात
करी आळस दूर अन् देई उभारी क्षणात
कॉफी आणि बरच काही पण चहाची वेगळी ही कहाणी
एक प्याला ये जिसकी है दुनिया दिवानी...
