STORYMIRROR

Varsha Shidore

Inspirational

4  

Varsha Shidore

Inspirational

माझं जगणं...

माझं जगणं...

2 mins
460

मी तुझं आयुष्य काय म्हणून जगावं 

मी माझं आयुष्य हवं तसं भरभरून जगलं।।धृ ।।


स्त्री होणं कुणा नाही रुचलं, कुणा नाही पचलं 

मी माझं असणं म्हणुनी माझ्यासाठी निवडलं 

हे जशास तसं माझं जगणं आज हे असं 

उद्याचं बुवा कसं काय मलाही नाही ठावं।।१।।


दिसण्यास माझ्या तुझं जरी लक्ष्य असलं 

तरी मला तमा माझ्या इच्छेचीच रे ठावं 

तुझ्या बोलण्याची त्यास नाही बघ लाज 

मला का असायला हवा तुझा रे साज।।२।।


आवाज माझा, तुझं घेणंदेणं नाही त्यास 

आलं मनी करून टाकलं, तुझा नाही फास 

मी मनसोक्त खिदळले जेव्हा हसावं वाटलं 

मी बिनधास्त अश्रू ढाळले जेव्हा रडावं वाटलं।।३।।


निस्वार्थी मनाचं काळजीवाहू काळीज माझं 

सगळ्यांचा भार वाहत गेलं निरंतर वेडंपिसं 

कर्तृत्वाचं जरी कधी माझ्या कौतुक झालं 

कुणाच्या डोळ्यात तरी का नि कसं रे खुपलं।।४।।


नारी मी नारायणी म्हणुनी फक्त देवीस पुजलं 

रणांगणी वीरांगना म्हणुनी रक्तात ओवाळलं 

सन्मानाच्या अबला पायऱ्या माझ्या मी चढेल म्हटलं 

कुणाच्या नावात ओळख नको माझी म्हटलं।।५।।


प्रश्नाचं जळतं निखार नजरांत करपलं 

मला त्याचं उत्तर माझ्याच नजरेत गवसलं 

जळणाऱ्यांनी जाळलं, हिणवणाऱ्यांनी हिणवलं 

माझं आयुष्य कुणासाठी उगाच नाही थांबलं।।६।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational