Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Awekar

Inspirational

4  

Manisha Awekar

Inspirational

हरवलेली माणूसकी

हरवलेली माणूसकी

2 mins
629


पहा जरा आजूबाजूला , किती गतिमान झालंय जग !

धावपळ , गर्दी , खेचाखेच

पुरता अडकलाय माणूस 

कोळ्याच्या जाळ्यातल्या किड्यासारखा!


अहो , कोणासाठी कोण थांबणार?

अन् कोण कोणाची विचारपूस करणार?

इथे दुस-याच्या सुखदुःखाची पर्वा आहे कुणाला?

धावपळच इतकी चालू की नातेसंबंध जपायला वेळ आहे कुणाला?

फक्त मी, मी, अन् मी!

ह्या 'मी ' चा कोशच इतका दाट झालाय ,

बाहेर पडणंच कठीण!


जरा डोकवा भूतकाळात

आठवतंय का माता-पित्यांचं जीवन ?

एकत्र कुटुंबातील वडीलधाऱ्यांना मान

आला अतिथी कसा संतुष्ट असे!

वासुदेवालाही पसाभर धान्य

शेजा-याची अडचणही आपलीच

दानाने अन् परोपकारानेच , त्यांचे जीवन व्हायचे धन्य!


आणि आता ?

आता , एखाद्याकडे औषधाला पैसे नसतील तर

फक्त निराशा

एखाद्या गरीब मुलाकडेफॉर्म फी नसली तर

फक्त वणवण

मित्र पुढे , मौजमजेला ,

वारा येईल तशी पाठ फिरवणारा

नकोसे वृद्ध आईवडील

वृद्धाश्रमात हद्दपार, निरुपयोगी गुरासारखे !

जड वाहनाने कुणी ठोकरलेलं.....

कोणी रक्तबंबाळ ........वेदनेनं कण्हणारं !

फक्त बघ्याची भूमिका अन् पोबारा.......

एखाद्या बाईची भाजीची पाटी डोक्यावरुन लवंडली तर......

मला काय त्याचे ?..... सहानुभूतीशून्य........


जे देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावतात ,

त्या सैनिकांच्या निधीला तरी सढळ हातांनी मदत ?......छे !!

कृतघ्न आणि संधीसाधू झालाय माणूस.

काळीज मागणा-या मगरीप्रमाणेच माणूस मित्रालाही फसवतोय ,

नैतिक मूल्ये अगदी पायदळी तुडवतोय.

स्वार्थाने अंध , मूक , बधीर झालाय अगदी !

संवेदना गळाठून गेल्यात , अगदी थंडगार बर्फासारख्या !!

पुतळ्यासारखा निश्चल झालाय , मनाने तो.

कोणी याचना केली , तर मदत तर राहूच दे ,

प्रेमाचे चार शब्द बोलायची माणुसकीही

तो साफ विसरलाय ,

खरं तर हरवूनच बसला आहे.


अरे माणसा , अजूनही वेळ गेलेली नाही.

हरवलेली माणुसकी , हा मानवजातीला लागलेला मोठा कलंक .

तू सदवर्तनाने पुसून टाक......

पुसून टाक.

बहिणाईंची आर्त हाक ऐक जरा ,

" अरे माणसा , माणसा.......

कधी होशील माणूस?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational