धन्यवाद
धन्यवाद
भारत चौगुले,
धन्यवाद...!
भार वाहतो वाचक आपला
रमतगमत आपल्या साहित्यात
तळागाळात सुजाण एखादा
चौकस बुद्धीने घुसतो कवींच्या अंतरात
पण...
गुरफटणे आता प्रत्येकालाआवडत नाही
लेकाचा मरू देत म्हणून नाद सोडतात
म्हणून म्हटलं आज वाचक शोधावा
त्याला थोडं पारखाव
आणि काय आश्चर्य
टाकलेला खडा जो आत तळाशी गेला
तो वर आलाच नाही
त्याला अंतच कवीचा लागला नाही
म्हटलं मी ही मग जाऊ दे
आता...
अगदी साधं सोपं लिहू
विस्तृत लिहू
आणि वाचकाला सांगू
बाबा
कविता, कविता असते
कधीतरी अंतरातल्या
विचारांना
ताडकन बाहेर काढण्याची कला असते
कधी कधी असं होतं
वाचक तेही पचवू शकत नाही
का कोण जाणे
कविताच पचनी पडत नाही
अजीर्ण होतं
आणि मग लंघन घडतं
तेव्हा कवीचं प्रेम उफाळून येत
त्याला परत खेचत...
पुन्हा पुन्हा वाच म्हणत
हीच त्या कवितेची
खरी खासियत असते...
ताकत असते..
