रानातला...!
रानातला...!


मळ्यातला उंबर....!
मळ्यातला उंबर
मनात घर करून आहे
दत्त दत्त म्हणूनच
तो हृदयी वास करून आहे...
लहान पणापासून
अनेक भावना जडलेला
एक वेगळंच भक्तीचं
मनात घर करून राहिलेला...
मोजक्याच फांद्या
मोजकीच पान
न सुटणार कोड
अडवत होत सदा घोडं...
वाटायचं सारख मनात
हा एवढा मोठा वृक्ष
पण असा रोडका का?
इतका रडका का?
एक दिवस कोड उलगडलं
हऱ्याचं जेंव्हा फांदीवर दर्शन झालं
ज्यांन वर्षानुवर्षं त्याला
बेमालूम पणे रोडक बनव
लं...
शेळ्यांसाठी पाला हा
नियमित फांद्या तोडून काढायचा
जणू आमच्या भक्तीलाच
नकळत चाप लावायचा...
काळजी पोटात घर करू लागली
त्याच्या जीवाची पर्वा वाटू लागली
शेवटी दत्त गुरूंना नमस्कार केला
आणि वृक्षचं बांधावरून काढला...
आजही तो आठवतो
डोळ्यात पाणी साठवतो
पण आशीर्वाद मनापासून
स्वप्नात येऊन नियमित देतो....!
त्याच्या फळांनी लगडलेल्या खोडाला
पाहून माया भक्ती दाटून येते
त्या झाडाच्या निमित्ताने
हऱ्याची आठवण मात्र आजही होते....!