नशा ( अभंग रचना )
नशा ( अभंग रचना )


नशा
( अभंग रचना )
नशा पाणी व्यर्ज I असो तो कोणीही I
नशा घेवू पाही | जीव असा ॥ १ ॥
नशा ती असावी I इतर कशाची |
लत व्यसनांची I राख करी ॥ २ ॥
व्यसना नसतो I मान पान काही |
एकटाच राही | नशेमधी ॥ ३ ॥
समाजात पत | कायमची जाते |
कोणीही बोलते | अपमाने ॥ ४ ॥
म्हणून तुम्हाला I एकच सांगणे |
जगा निर्वेसने I सर्वांसाठी ॥ ५ ॥