STORYMIRROR

Ravi Patil

Abstract Others

4  

Ravi Patil

Abstract Others

माझं शिवार फुललं..!!

माझं शिवार फुललं..!!

1 min
371

वादळानं झोडपलं

गारपिटीनं बदडलं!

उभ्या पिकाचं वाईच

अवसान गळालं!

अन् म्हणे, माझं शिवार फुललं!!


जलयुक्त शिवाराचं पाणी

सरकारी फायलीत अडकलं!

पाणी अडवा पाणी जिरवा

राजकारणात दबून मेलं!

अन् म्हणे, माझं शिवार फुललं!!


काबाड कष्टाकऱ्यांच्या धैर्यातून

थोडफार पिक मुठीत गवसलं!

व्यापाऱ्यांच्या अनागोंदीनं मात्र

घामाचं मोल धुळीत मिसळलं!

अन् म्हणे, माझं शिवार फुललं!!


औद्योगीकरणाच्या थोतांडातून

लोडशेडींगच्या झटक्यानं मारलं!

सावकारी कर्जातून गळ्याला

सरकारी फासानं आवळलं!

अन् म्हणे, माझं शिवार फुललं!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract