STORYMIRROR

Ravi Patil

Others

3  

Ravi Patil

Others

नाळ

नाळ

1 min
261

मी काय म्हणतो, तायडे तुला

एकदा माझ्याशीपण भांडायला ये!

भातुकलीच्या खेळामधली आई बनून

चिऊकाऊचा घास भरवायला ये!!


कट्टी फू करत रडीचा डाव मांडून

दादाच्या पाठीवर घोडा खेळायला ये!

बाबांच्या खिशातनं गपचुप पैसे काढून

ह्या दादाचे लाड पुरवायला ये!


रक्षाबंधन, भाऊबिजेला ओवाळून

दादाच्या खिशावर डल्ला मारायला ये!

दिवसभर दादाला छळून झाल्यावर

त्याच्याच डोक्याला तेलाने, मस्का मारायला ये!!


खरच खूप आठवण येतेय गं तायडे तुझी

एकदा मनसोक्त गप्पा मारायला ये!

सासूरवाडीत दमली असशील ना खुप

हक्काच्या विश्रांतीसाठी एकदा, माहेरवासाला ये!!


Rate this content
Log in