STORYMIRROR

Ravi Patil

Romance

3  

Ravi Patil

Romance

हा दिवस प्रेमाचा

हा दिवस प्रेमाचा

1 min
187

मनात तू श्वासात तू

सांग सखे, माझी तू होशील ना!

हरसाल होकार देतेस तू

याही वर्षी, होकार तू देशील ना!!


व्हॅलेंटाईनचा तर नुसताच बहाणा

गुलाबाच्या फुलागत तू उमलशील ना!

दरवळ तुझ्या प्रेमाचा गं सखे

आजही मला तू मोहून घेशील ना!!


नटून, थटून माझ्यासोबत बसून

गोड गुपित मनातलं, मला तू सांगशील ना!

चहाचा कप, दोघांत एक चाखून

रोज स्वप्नात सखे, माझ्या तू येशील ना!!


मानेला लचक अन् बदमाशी नजर

पुन्हा मला तू मदहोश करशील ना!

गालावरची बट, त्यावर लाडीक हसून

रोजच्यागत मला तू प्रेमात पाडशील ना!!


प्रेमाच्या सागरात येउ दे पुर

माझ्यासवे आजही, पोहायला तू येशील ना!

मी तूझा राजा, तू माझी राणी

सांग सखे, आजही तू माझी होशील ना!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance