Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Bharati Sawant

Abstract

4  

Bharati Sawant

Abstract

वास्तव

वास्तव

1 min
347


किती केला आटापिटा 

बदलत नाहीच वास्तव

शांत होतो ओरडणारा 

बसतो गप्प लज्जेस्तव


करतात हांजी हांजीच

सुधारत नाहीत माणसं 

डोलती मुक्त वाऱ्यासंगे 

जशी रानातली कणसं 


परिस्थिती बदलण्यास 

आले कित्येक सुधारक

दंगाधोपा अन् मारझोड 

संपत नाही हे अराजक 


असुनि साक्षर सुशिक्षित

ही माणसं म्हणू की मेंढरं 

मनमानी करी वाटेल तशी

झालेय काळ्याचंच पांढरं


संपलीत कितीतरी दशकं 

शिकवण देणारेही खपले 

माणुसकीचे असे हे मोल

कोणी कधी नाही जपले 


भांडण झगडा मारामारी 

रोजचेच असती हेवेदावे 

उगवत्या नव्या पिढीपुढे

डोळ्यांसमोर हेच दिसावे


Rate this content
Log in