जगणं
जगणं
किती लिहीलं किती पुसलं
पानावर होतं म्हणून जमलं
किती पाहिलं किती विसरलं
वरदान आहे म्हणून टिकलं
किती ऐकलं किती वाचलं
अनुभव हवा म्हणून जपलं
किती असलं किती नसलं
श्वास आहेत म्हणून चाललं
किती खरं किती खोटं
जगणंही आहे म्हणून कळलं
