जगूया
जगूया
खुश किंवा नाखुश दोन्ही जगता आलं पाहिजे
काठावरून नाही उतरून पोहलं पाहिजे
जे मिळालं ते जगलं पाहिजे
या अनेकांच्या गर्दीत थोडं हरवून शोधलं पाहिजे
आपण सगळे सबळ आहोत ह्या विचाराने
प्रत्येक दिवसाला ऊर्जेने सामोरं गेलं पाहिजे
कधी लागलं म्हणून माघार कशी घेणार
हावरटपणानं थोडक्यात संपवून नाही चालणार
अडकलो बुडलो तरी पल्याड जाऊच
ह्या तयारीत पुन्हा पुन्हा उडी घेतली पाहिजे
काय होईल च्या विचारात अनुभव नकोसे का
झाली जरा पडझड तर काय बिघडलं
मोडून जोडण्याच्या शक्यता असलीचं ना
त्यांना आठवून जगूया जे जगता येईल ते
हिशोब नेहमी बरोबर येणार नसेल
मग हट्ट बदलून काही नवीन मिळालं तर
मी असा आहे मी तसा नाही पेक्षा
आता हे असं आहे इतकं सोपं व्हायला पाहिजे
