STORYMIRROR

Bipin More

Abstract Tragedy

4  

Bipin More

Abstract Tragedy

परपंचं

परपंचं

1 min
284

माफी करून तरं पाह्य ना माय 

जगन सोपं होइनं माजे बाय 


समदं चूकल हे खरं हाय 

नेमकं कुनाचं...त्योच सवाल खाय 


उन्हाचं भ्याव नी सावलीला ऱ्हावं

सावलीत बी पाय भाजत्यातंच की गं


आधार आस्सं.. काळं कुट्ट खोपाटं 

डोळं कोपऱ्याचं नजर धाव वाऱ्यातं 


जावं म्हनलं बाहीर वाटंला...इच्यारावं

तीनं बी कसस हीतच लगी आनावं 


तवां ठरीवलं आत्ता लांबन जायाची न्हाई

रानं पेटलयं उगी थांबायची न्हाई


सोसायचं हे बी आपुन समदं जल्मात 

सुपाचं काळीज दडविलं खोलात 


म्होरल्या येळला मातर सोपं याचं न्हाई

सोसल्या फाटक्या चिंधींचा परपंच मांडायचा न्हाई 


এই বিষয়বস্তু রেট
প্রবেশ করুন

Similar marathi poem from Abstract