STORYMIRROR

Bipin More

Abstract Inspirational

3  

Bipin More

Abstract Inspirational

साध्य

साध्य

1 min
133

लिहायचं होतं मला 

मना सारखं मनापासून

शब्दांचा गोंधळ घातला

विवेकाला बाजूला सारून


वाहवा मिळवली

संपन्नता नांदती झाली

लाख मनाला भेदून आरपार

कविता माझी तरून गेली


आसवं मोत्यांची शेती

लिहीली आणिक पेरली

सोबत संगत धरली अशी

की शब्दांची गुलामी केली 


भ्रम विलासी जाहला

विषय संपतं चालला

परिच्छेद बदलला जेव्हा

रसिक माझा पाठमोरा झाला


भरल्या घरचा खांब वाकला

एकूण एकाचा हिशोब कळला

लिहिणं फक्त लिहिणं होतं 

जगण्याचं ते साध्य नव्हतं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract