STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

झुला बाई झुला

झुला बाई झुला

1 min
159

नागपंचमीचा सण

आला आला गं सयांनो

जाऊ नटूनी थटूनी

खेळायला गं सख्यांनो


कामे बिगीने उरका

हात चालवूनी वेगे

नैवेद्याचा थाट भारी

तबकात ठेवा सारे


करु पूजा नागोबाची

दूध लाह्या वाहूनिया

भावे नमन करुनी

आज कृतज्ञ राहू या


आज झुलू झुल्यावर

उंच जाई माझा झुला

मन हळवे होऊनी

जाई माहेर वाटेला


झुल्यावरी झूलताना

मन होई पिसापरी

दिसे मोद चहूकडे

दुःख काळजी विसरी


श्रावणाच्या झूल्यावरी

देहभान विसरावे

वाटे आज सखीसवे

उंच नभी विहरावे


भार मनाचा जाईल

विरुनिया वाऱ्यावरी

तृप्त मनाने जाऊ या

सखे खेळूनिया घरी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract