STORYMIRROR

Bipin More

Abstract

3  

Bipin More

Abstract

पाऊस.. एक आधार

पाऊस.. एक आधार

1 min
228

तू असाच ये 

येताना विचार करू नकोस

पण आलास की भेटून जा

मला अंतर देऊ नकोस..


तुझ्या ही छटा आहेत

हे विसरू नकोस

मी आज वेगळा

याला नाकारू नकोस


सोबत चालतोस

म्हणून किती आधार..

थांबेल जिथे प्रवास 

तिथून तूझा मुक्त संचार 


शब्दांना मुकेपण यावें 

इतका तुझा व्याप 

सर्वांना स्पर्शून सारखा

सोडून नवीन श्वास 


अमूर्ताला साक्षी असा कोण आहे 

विचारी कशाला ते तुझे रूप आहे

अवकाशाचा स्वामी अंतरंग तुझा पाहे

भेट थेंबांशी.. विरह आवडीचा साहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract