STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

गैरसमज

गैरसमज

1 min
208

राग जर असेल मनात 

खोटे ऐकलेले पण तिथे खरे वाटते चुकीचे जरी नसलो आपण 

तरी चुकीचे असल्याचे भासते  


होते सत्य मग दिसेनासे 

मनी चादर अंधाराची ओढल्या जाते बिना संवादाचे वाद होतात 

किरणे विश्वासाची कुठेतरी अडल्या जाते  


अर्थहीन गोष्टीशी स्वार्थ उगीच जोडला की तिथे गैरसमज आणखी वाढल्या जाते

साधे बोलण्याला ही फाटे फुटतात 

 प्रेमळ नात्याला देखील कुठेतरी तडा जाते


फक्त एक गैरसमज

 चूक कोणाची, आणि शिक्षा कोणाला? क्षणात सारे संपून जाते एका ठिणगीने आभाळ हे सारे पेटल्या जाते


 करावा थोडा विचार 

बदलून कौल मनाचा 

होईल घट्ट वीण नात्यांची प्रयत्न असावा एक दीर्घ श्वासाचा थोड समजून घेण्याचा, 

थोड समजावून सांगण्याचा 

 विचारांच्या खुर्चीखाली मनमर्जीपणा नमवला की तेथे समंजसपणा दिसतो

 प्रश्न असतो फक्त विश्वासाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract