STORYMIRROR

Bipin More

Abstract

3  

Bipin More

Abstract

कविता..

कविता..

1 min
185

विचारलं "सहज कशी रे करतोस कविता?"

सुचेना काही तो पुरता गोंधळला 

खूप आग्रह केला तेव्हा म्हणाला 

"कविता"अशी काही करता येत नाही मला "


"विचारांना मोकळीक देत जातो इतकी

पावसाळी चिखलातून वाट काढावी जितकी 

खूप जमतात शब्द पानभर हवरटासाखे

पण सगळे कुठे वळतात आपल्या मनासारखे


काहींना खोडतो कारण गरज नसते

काहींचा अर्थ कळण्याची अक्कल नसते

काही उरतात असेच बिचारे लाचार 

त्यांना नसतो कुणाचाच आधार


विचारांच्या सावलीत आश्रय मिळतो

शब्दांच्याच जगात भावनेला मान मिळतो

शोधात सारखा जीव बुडालेला असतो

वाचाणारा त्याला "कविता" म्हणून वाहवा करतो"


वाचक कवितेत स्वतःला शोधतो

लिहिणारा स्वतःला शब्दात हरवतो

ज्या सुंदर संगमावर हा आविष्कार घडतो

तिथून नव्या वाटेवर एक आधार वाहता होतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract