जागर
जागर
घडू दे जगाला
तुझ्या ममतेचा पाझर
जनता करील
तुझ्या कार्याचा आदर
मतदाना पुरती
नको योजना सादर
घडोघडी जनता
करतील का कदर?
संविधानाला नीट
न बदलता तु वापर
लोकांवर अन्याय
तुझ्या डोक्यावर खापर
होशील खलास
किती ओढशील चादर
विरोधात उभा
अखंड हा भिमसागर
झाकून कोंबडे
नको खोटा जागर
पापाची रे तुझ्या
भरू नकोस घागर
दीन दलितांसाठी
जरासा तरी पाझर
विलासी जगाला
दाखवू नको गाजर
