कल्पना
कल्पना
कल्पनेच्या कुंचल्यातून
रंगवित चित्रात शब्दांना
एक कवी युगायुगाचा
सजवितो फुले पानांना..
उदयास येते अवचित
न पाहिलेली रम्य पहाट
क्षणासाठी का होईना
विसरतो जगताचे रहाट...
कधी कधी तर पोचतो
हातही त्या शशीला
फिरून मस्त तारकांत
रंगवतो खूप स्वप्नांना...
आणतो रंग इंद्रधनुचे
नक्षी मजेदार तरंगती
करी उपवन जंगलाचे
नवे नवे काव्य जन्मती..
भाकरीत दिसतो चंद्र
दिव्यात दिनकर दिसे
पहुडतो तो गोधडीत
कवीला तो स्वर्ग भासे...
ऐकत गुंजन पक्षांचे
हरखून जाते सारे भान
रातकिडे गुणगुणती
कवी विसरे भुक तहान ..
