STORYMIRROR

Sandhya Vaidya

Classics

3  

Sandhya Vaidya

Classics

*✍️आईची प्रित

*✍️आईची प्रित

1 min
6

अनोखी प्रित आई तुझी

शिकवून मला गेली तू

पाण्यातही असते ममता

दाखवून मला गेली तू..।


पालवी हिरवी माया तुझी

दवबिंदू त्यावर जपलेस तू

हलवून पुष्प पाकळ्यांना

सुगंधी जीवन जगलीस तू..।


पसरला सुगंध वाऱ्यासवे

मनामनात दुडदुडलीस तू

झिजवून कोमल शरिराला

विचारवाणी तुझी पेरलीस तू..।


फुलांच्या संगतीत वाढली

काट्यासही कुरवाळलेस तू

गालीच्यावरील पाऊल तुझे

प्रसंगानुरूप रक्ताळलेस तू..।


बघतांना कधी त्या नभाकडे

पवित्र देवता भासलीस तू

माता माऊली ममता ओतून

आसमंतात विरघळलीस तू..।


मैत्री जपतांना माऊलीशी

झालीस माझी सावली तू

जगतांना मस्त रंगबेरंगी

रांगोळीत रंग भरलेस तू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics