उन्हाळा
उन्हाळा
हा आता आला उन्हाळा
साहिना उन्हाचा कडाका
शुष्क कोरडे सुकतो गळा
आणि हा लग्नाचा धडाका
नेसली जरी शालू भरजरी
रंगरंगोटी खुप साज केला
थोपवित घामाच्या धारा
साराच शृंगार वाहून गेला
उन्हाचा बसताच तडाखा
अंगाची होते लाहीलाही
पाण्याच्या कमतरतेमुळे
शरीराची होते त्राहीत्राही
उन्हाळा हा कडक असा
जमिनीला पडल्या भेगा
येताच पावसाच्या सरी
पेरणीच्या कामी लागा
प्राणी पक्षी ते आसुसले
मिळेना पिण्याचे पाणी
तहानेने सारे कासावीस
उन्हामुळे ती येते ग्लानी
उन्हामुळे जमेना आमचे
प्रकाश दाता सुर्य बावळा
वेडावाकडा तापतो असा
पिडण्या येतो हा उन्हाळा
