STORYMIRROR

Sandhya Vaidya

Inspirational

3  

Sandhya Vaidya

Inspirational

आईऽऽऽ

आईऽऽऽ

1 min
20

आईऽऽ किती हाक मारू ग तुला मी

तुझ्यावीण पोरकी ,असुन सा-यात मी


कसे गेलेत हे वर्ष चार सांगू कसे मी

आठवणीत तुझ्याच क्षणोक्षणी मी


होतीस सावली वृक्षापरी, निश्चिंत मी

सावरले काटे तु, योग्य मार्गावर मी

 


वारा दुःखाचा, तुझ्यामुळेच दुर राहिले मी

सुख दुःखाला कसे समसमान साहिले मी


सहनशक्ती तुझी, माझी मला समजले मी

प्रसंगी दगडालाही घामाघूम मग केले मी


विश्वास स्वतःवरचा, न कधी ढळू दिला मी

तुझीच किमयाही, कुणाला न छळू दिले मी


वावर तुझा आजही, अवतीभवती तुझ्या मी

अभिवादन माते, अस्तित्वास माझ्या कृतज्ञ मी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational