STORYMIRROR

Sandhya Vaidya

Abstract

3  

Sandhya Vaidya

Abstract

स्वप्न भंगले

स्वप्न भंगले

1 min
203

आता तूझ्या मताचे, चारच लोक राहिले 

ज्यांनी तुझ्यासवे ,स्वप्न समानतेचे पाहिले 


विषारी गढी जातीची, घसरतांना पाहिली

शिकवण बुद्धाची ,घरोघर पसरतांना पाहिली


वृद्ध झाली चळवळ, लोक गळतांना पाहिले

ज्यांनी विषमतेचे,जहर लिलया साहिले 


झिरपला विचार तुझा,आता सारे सुखावले

 आक्रोश करणारे सारे , तुला विसरतांना पाहिले


होते तेव्हाही संविधान, तुम्हीच आम्हा दिलेले

रोजचेच अत्याचार,न्याय कधी न मिळालेले


आता तरूण झाली, मनूवाद्यांची दलाली

कुणी उठावे लढायला, तरूणाई पैशात बुडाली


हरवले बिज अस्मितेचे,शासन स्वार्थात रंगले

शासन कर्ते होण्याचे, आमचे स्वप्नच भंगले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract