दे जरासे
दे जरासे
तु जरासे तुझे ,दे मन मला
अर्पण चरणी,हे तन तुला
एक घे उसासा, ठेव भरोसा
दान देईल मी, ते धन तुला
याचना माझी घे जरा ध्यानी
पावन सारे ते, दे अंगण मला
कठीण समयी सोबती असेन
आज देते मी हे वचन तुला
बहाने सोड आता भेट द्यावी
तुझ्याविना वाटे हे मरण मला
तिढा तुझ्या मनात अजून का
गुंतते मन हे नसे समज तुला
नेत्र होती रोज पाणी पाणी
भेटायला मोकळे गगन तुला
सोड हे आढेवेढे एकांती बसू
रूसवा छळतो हा सतत मला
कालचे दिलेले ते प्रेम पाखरू
आज हवे फिरुन ते परत मला