भेट
भेट
आम्ही सख्या कधीतरी
भेटलो अशा एकत्र
आनंद असा असेल का
शोधून बघा सर्वत्र
गेले वर्षामागून वर्षे किती
मैत्री असावी जपून
आले गेले पावसाळे सारे
भेटीत श्रेष्ठता आतून
आतुरता दाटली डोळ्यांत
वाटेकडे लागले डोळे
आजही हृदयात सख्यांच्या
भाव निरागस भोळे
विसावलो संसारात सुखी
हवेहवसे मैत्रीचे क्षण
भेटताच उमलून बहरले
जुने आठवणींचे कण
निस्सीम भेट गहीवरली
सुगंध तो दरवळला
लाजेल पारिजातक मनी
हर्ष गगनी सळसळला
