STORYMIRROR

Priyanka Kardekar

Abstract Inspirational

3  

Priyanka Kardekar

Abstract Inspirational

"चैत्र चाहूल"

"चैत्र चाहूल"

1 min
28K


शिशीर संपला वसंत आला चैत्राची 

चाहूल सोबतीला.

कोकीळ कुहू- कुहू गाते 

सप्तसुर नभी पांघरूते 

स्वरानी त्या वनराणीही होते कुसुमबाला.

 

हिरवगार रान वाऱ्यावरी डोलते

पाटाच पाणी झुलूझुलू वाहते

हिरव्या शालूचा साज घालतो भुरळ जिवाला

चैत्राची चाहूल सोबतीला

 

नववर्षांची गुढी उभारली जाते

अवघे विश्व मंगलमय होते

साऱ्यामुळेच ह्या नवीन उभारी मिळते आयुष्याला

चैत्राची चाहूल सोबतीला

 

ऋतूंचे चक्र फिरत राहते

उन सावल्यासारखे कडूगोड अनुभव देउन जाते

दुःखातही सुखाने राहण्याची शिकवण मिळते जिवनाला

शिशीर संपला वसंत आला

चैत्राची चाहूल सोबतीला....

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract