" मैत्री"
" मैत्री"
कधी रिमझिम झरणारी बरसात,
कधी चमचमणारी चांदण्यांची रात,
मैत्री म्हणजे आयुष्यभराची लाभलेली साथ.
आनंदाच्या क्षणी जणू फूलणारी सदाफुली अंगणात,
संकट काळी देते बळ;करण्या परिस्थितीवर मात,
मैत्री म्हणजे आयुष्यभराची लभलेली साथ.
एकाच डब्यातून खाल्लेले दडपे पोहे वा फोडणीचा भात,
साऱ्याची आठवण येताच नकळतच आलेले पाणी डोळ्यांत,
मैत्री म्हणजे आयुष्यभराची लभलेली साथ.
निरव शांततेत चंद्राच पडलेल जसे प्रतिबिंब पाण्यात,
साठवून ठेवलेल्या आठवणी; जणू मोती शिंपल्यात,
मैत्री म्हणजे आयुष्यभराची लभलेली साथ.
भांडणे,गैरसमज हवेत विरून जातात एका क्षणात,
अवखळ वेळेची किलबिल जेव्हा गुंजते कानात,
मैत्री म्हणजे आयुष्यभराची लभलेली साथ.
घेउनी उंच भरारी सदैव विहरत राहो गगनात,
पण; मैत्रीच्या एका हाकेला परततील ना आपल्या घरट्यात,
कारण मैत्रीविना सारे काही सुने- सुने वाटे जगात,
म्हणूनच तर मैत्री म्हणजे आयुष्यभराची लभलेली साथ...
