STORYMIRROR

Priyanka Kardekar

Abstract Inspirational

2  

Priyanka Kardekar

Abstract Inspirational

"चैत्र चाहूल"

"चैत्र चाहूल"

1 min
2.5K


शिशीर संपला वसंत आला चैत्राची 

चाहूल सोबतीला.

कोकीळ कुहू- कुहू गाते 

सप्तसुर नभी पांघरूते 

स्वरानी त्या वनराणीही होते कुसुमबाला.

 

हिरवेगार रान वाऱ्यावरी डोलते

पाटाच पाणी झुळूझुळू वाहते

हिरव्या शालूचा साज घालतो भुरळ जिवाला

चैत्राची चाहूल सोबतीला 

नववर्षांची गुढी उभारली जाते

अवघे विश्व मंगलमय होते

साऱ्यामुळेच ह्या नवीन उभारी मिळते आयुष्याला

चैत्राची चाहूल सोबतीला 

ऋतूंचे चक्र फिरत राहते

उन सावल्यासारखे कडूगोड अनुभव देउन जाते

दुःखातही सुखाने राहण्याची शिकवण मिळते जीवनाला

शिशीर संपला वसंत आला

चैत्राची चाहूल सोबतीला....

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract