वास्तव
वास्तव
रेव्ह पार्ट्यांच्या बातम्यांनी माध्यमांना ऊत येतो
भरभरुन बोलतांना तोंडाला फेस येतो.
सीमेवर शेतकरी, चिरडून मारला जातोय.
बड्या सेलिब्रेटिज च्या बिघडलेल्या पोरांचे शोक
करोडो रूपयात फुंकले जातात चरस, गांजाच्या धुरात
सुशिक्षित मध्यमवर्गीय तरूण वनवन नोकरीच्या शोधात.
ऊँचे लोग ऊँची पसंद वर्तमान पत्रे ही
दिशाहीन झालीत नको त्या बातम्यांच्या नादात.
गरीबांची लेकर पोटभर अन्नालाही मुकतात.
नशेबाज औलादीना निर्दोष मुकत करायला सारी सरकारी सूत्र हलतात
सोडवायला त्यांना म्हणे न्यायालय रात्री अपरात्री खुलतात
वकिलांच्या फोंजा ईंच ईंच लढतात थोरामोठयांचे, ड्रग बाज वीर बच्चे निर्दोषच सुटतात.
सरळ मार्गी मानसांचे जाब विचारणेही गुन्हे ठरतात
पैशाच्या धुंदितले पालक पाणयासारखा उधळतात
उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवितात
हवे तसे नको ते सारे लाड पुरवितात
तरीही हे दिवटे व्यसनात धुंद होतात
या सारया भंपक गिरीला माध्यमं जीवाच रान करून टिपतात
कित्येक शेतकरी आत्महत्या करतात आसमानी संकटाने हैराण होतात
गरीब सुशिक्षित पोरं निराश ने ग्रस्त होतात
नोकरीसाठी वनवन भटकतात
छोटी छोटी स्वप्न ही धुळीस मिळतात निराश होतात
कुठल्याच सरकारला त्यांच पडलेल नसतं
अमीरजांदयाच्या पो
रांसाठी मात्र तेच सरकारं सूत्र हालवत.
ईथे स्त्रींयाच्या अब्रूशी चे खेळ चालतात
नाकयानाकयां वर पोरी छेडलया जातात कोवळ्या कळ्या खुडलया जातात
त्यावर भाष्य करायला नेत्यांना वेळ नसतो माध्यमांना दलाली ची कमाई नसते
वर्तमान पत्रात जागा नसतात.
जमलच तर जातींचे रंग देऊन स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी जो तो पुढे येत असतो
तिच्या साठी कुठलेच न्यायालय रात्री अपरात्री ऊघडू नाही शकत.
का तर ती मजबूर लाचार असते वस्ती पातळीवर शिक्षणाचे समजलेलेच नाही मुल्य अजुनही.
कळलेय ज्यांना त्यांना योग्य संधी मिळत नाहीं
गरींबाच पोट उच्च शिक्षणा च्या आड येत कधी कधी आईबापाच आडाणीपणं ही नडत
ऐकलंय का? कधी गरजलीय न्यायदेवता कुण्या शेतकरयासाठी मध्यरात्री
का पेटून ऊठलेत लोकप्रतिनिधी कि, माध्यमांचे प्रतिनिधी?
वैफल्य ग्रस्त तरूणांसाठी कोण आवाज ऊठवतंय
किती संधी उपलब्ध आहेत भविष्यासाठी?
वस्ती पातळीवर वर लेकर अजान पणे हिंडतात
कुणी रस्त्यावर भीक मागतात हि निरागस बालपण
जगाच्या शिक्षणाच्या स्पर्धेतून अपसुक बाहेर पडतात
हि दोन जगाची दोन टोक जशी नदीचे दोन काठ कधीही एकमेकांत न मिसळनारे.
तीच स्थिती या देशाची आहे ईथे उच्चभ्रूंच्या पैशावर न्यायालय सरकार बदलतात
मग समाजातल्या दरया आणखी खोल होत जातात