अमृताच्या वृष्टीमधी
अमृताच्या वृष्टीमधी
अमृताच्या वृष्टीमधी
ओढवते हिरवळ
सुख शांती समाधान
शिव शंभु बोलें जग
भक्तीमधी कायनात
पावलोपावली चाले
निराकार नीर रूप
सदा कल्याणात पावे
ओमकार आदिदेव
बहरून सृष्टी सारी
नवचैतन्याच भावं
देई सूर तालामधीं
डोलतय जगी सार
फुलवून फुलबाग
संगीतात नाचे आत्मा
लिन होत नटराज
