जायाचे दिस येईल
जायाचे दिस येईल
जायचे दिवस येतील
किरदार निभावून जाऊ
एक तुझ्या माझ्या प्रेमाचं
परिवार वृक्ष वाढवत नेऊ
आल्या अडचणी सोडवत
संसार बाग फुलवू
काय लागते? ते प्रेम देत
मस्त फळ भरत आणू
मग चाखत जिणं वेळेत
गोड आंबट पाहून चालू
वठवून हावभाव मुखावरी
पात्र आपले नटवून जाऊ
वास्तवात प्रवास हा
देखावा म्हणून पाहत राहू
सुख वाटू सर्वांना
अन् दुःख सारे पचवून घेऊ
जायचे दिवस येतील
किरदार निभावून जाऊ
