सखी दोर प्रेमाचं धरुनी
सखी दोर प्रेमाचं धरुनी
सखी दोर प्रेमाचं धरुनी
जिणं सहज करून चालू
ते स्वतः बरोबर जोडीनं
तन सवरून बाग फुलवू
मग जिणं पथावर काही
नाजूक फुलासम पसरून
जिणं सजवत दोघा जीवाचं
मोहरतं बहरून चालू
असता कोणत्याही संकटात
जिव्हाळ्यानं धीर देऊन
काळजात ठेवून चालत
संयमान वेळ निभावून चालू
असंच हे खरं प्रेम असतं
एकमेकाची सावली होऊन
प्रेमात मरतानी पण
एकमेकांसाठी आनंदचं मानु
सखी दोर प्रेमाचं धरुनी
जिणं सहज करून चालू

